अभिनेत्री सारा अली खान नेहमीच तिच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांना भुरळ घालते. आज सारा अलि खान तिचा 29वा वाढदिवस साजरा करत आहे.
सारा अली खानने नुकताच सोशल मीडियावर एथनिक ड्रेस परिधान करत फोटो शेअर केले आहेत. या रक्षाबंधनला तुम्हीसुद्धा साराने दाखवलेले हे ड्रेस ट्राय करू शकता.
साराने घातलेला हा जांभळ्या रंगाचा ड्रेस फारच सुंदर आहे. हा ड्रेस तुम्हाला एक पारंपरिक लुक देईल. यावर्षीच्या रक्षाबंधनसाठी हा ड्रेस नक्की ट्राय करा.
या ड्रेसवरील फ्लोरल प्रिंटमुळे ड्रेस आणखीनच खुलून दिसत आहे.
साराने पांढऱ्या रंगाचा एम्ब्रॉडरी शरारा घातला आहे जो रक्षाबंधनसाठी सुंदर आणि परिपूर्ण असा ड्रेस आहे.
साराने गुलाबी दुपट्ट्यासह परिधान केलेला चमकदार गुलाबी शरारा खूपच सुंदर आहे. जर तुम्हीसुद्धा रक्षाबंधनला असं काहीतरी घालण्याच्या विचारात आहेत तर हा ड्रेस नक्की ट्राय करा.
राखीसाठी योग्य असलेला हा ऑर्गेन्झा शरारा सेट एक परिपूर्ण ड्रेस आहे. यामुळे तुम्हाला क्लासी लूक मिळेल .