मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचे प्रमाण दिवसेंदिवस ढासळत चालले आहे.

Nov 04,2023


अशात प्रदूषणापासून वाचण्यासाठी काय उपाय करावे हे आपण पाहणार आहोत.


बाहेरच्या विषारी हवेशी लढण्यासाठी आहारात हळद, तुळस, लवंग, आले इत्यादिचा समावेश करा जेणेकरून तुमची रोगप्रतिकारक शक्ति वाढण्यास मदत होईल.


घरी ईनडोर झाडे आणा ज्यामुळे घरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.


घरात धूम्रपान करणे टाळा, कारण तंबाखूचा धूर हा घरची हवा प्रदूषित करणारा एक मुख्य घटक आहे.


सिंथेटिक एयर फ्रेशनर वापरणे टाळा, त्यापेक्षा आयुर्वेदिक गोष्टींपासून बनवलेले धूप वापरा.


आवश्यकता नसल्यास बाहेर जाणे टाळा.


हवेतून विषारी घटक हटवण्यासाठी घरात एयर प्यूरीफायर लावा.


घरी कापूर जाळून त्याचा सुगंध घेणे फायदेशीर ठरू शकते.


घरी दररोज साफ-सफाई केल्याने घरातील धुळ आणि एलर्जी नाहीशी होऊ शकते.


जेवण करताना होणाऱ्या धुरामुळेही श्वसनाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे जेवण बनवताना एग्जॉस्ट पंखा किंवा चिमणीचा वापर करा.

VIEW ALL

Read Next Story