जेव्हा आपण प्राणी किंवा पक्ष्यांच्या जीवनाबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा बऱ्याचशा आश्चर्यकारक गोष्टींचा खुलासा होतो.
पक्ष्यांचे सुद्धा आपल्या साथीदारांसोबत सलोख्याचे संबंध पाहायला मिळतात.
असे सुद्धा काही पक्षी आहेत, जे आपले साथीदार मेल्यानंतर कधी स्वत:सुद्धा मरण पावतात किंवा स्वत: साठी साथीदार शोधतात.
क्रेन हा असा एक पक्षी आहे जो आयुष्यभर आपल्या एकाच साथीदारासोबत राहतो. ते नेहमी एकमेकांसोबत राहतात आणि एकमेकांची काळजी घेतात.
पेंग्विनच्या बाबतीत सुद्धा असंच काहीसं आहे. पेंग्विन प्रजातीतील एम्स पेंग्विन नेहमी जोडी बनवून राहतात आणि हे कधीच अधिक काळ एकमेकांशिवाय नाही राहू शकत. साथीरार मरण पावल्यानंतर निराशेमुळे स्वत: पाण्यात बुडून मरण पावतात.
किवी पक्षी आपल्या साथीदारासोबत सलोख्याने राहताना दिसतो. साथीदार मेल्यानंतर हे पक्षी सुद्धा स्वत:चा जीव गमावतात.
गोल्डफिंचचं सुद्धा आपल्या साथीदारासोबत अत्यंत घट्ट नातं असतं. साथीदार मरण पावल्यानंतर हे पक्षी एकटं राहून आपलं जीवन व्यतित नाही करु शकत.
कॉंडोर प्रामाणिक पक्ष्यांपैकी एक मानला जातो. साथीदार मरण पावल्यानंतर या पक्ष्यांची मानसिक अवस्था कोलमडते आणि खूप काळापर्यंत दु:खात आपलं जीवन व्यतित करतो.