बाजरीच्या भाकरीला तीळ लाऊन का खातात? जाणून घ्या नेमकं कारण

Jan 12,2025


भारतीय सणासुदीला विशेष खाद्यपदार्थ बनवले जातात.


भारतीय परंपरेनुसार खाद्यपदार्थ बनवण्यामागे अनेक आरेग्यादायी फायदे लपलेले असतात.


संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी तिळ लाऊन केलेली बाजरीची भाकरी खाल्ली जाते


भाकरीवर जे तिळ लावले जातात त्यातून कॅल्शिअम आणि नैसर्गिक तेल मिळते. हे शरीराला ऊर्जा देण्यासाठी उपयुक्त ठरते.


हिवाळ्यात केसांमध्ये कोंडा होऊन केस गळण्याचे प्रमाण वाढते, अशावेळी बाजरीच्या भाकरीवर लावल्या तिळातील नैसर्गिक तेल डोक्यावरील त्वचेला कोरडी होण्यापासून थांबवते.


हिवाळ्यात आपण अनेकदा कमी पाणी पितो, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते.


बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते तसेच तिळाचे गुणधर्म गरम असते, त्यामुळे पोट साफ होण्यात मदत होते.


हिवाळ्यात हाडं दुखणे, हातपायांना मुंग्या येणे अशा कित्यक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते.


या समस्यांपासून सुटकेसाठी तीळ लावलेली बाजरीची भाकरी रामबाण उपाय ठरते.

VIEW ALL

Read Next Story