भारतात मंकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी हा सण 14 जानेवारी म्हणजेच मंगळवारी साजरा केला जाणार आहे.
मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो. या भोगीच्या दिवशी मिक्स भाजी करण्याची परंपरा आहे.
ही भोगीची भाजी बनवताना त्यात कोणत्या भाज्यांचा वापर करायला हवा?, ते पाहूयात.
वाटाणे, कोवळे हरभरे, ताजी तूर, वालाच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, गाजर, वांगी, बटाटे आणि टोमॅटो या भाज्यांचा समावेश असतो.
तीळ, खोबरे आणि शेंगदाण्याचे वाटण लावून रस्सेदार किंवा सुक्की भाजी केली जाते.
भाजी बनवताना आवश्यकतेनुसार ऊसाच्या छोट्या तुकड्यांचा सुद्धा भाजी बनवताना वापर करु शकता.
या भाजीसोबत तीळ लावून बाजरीची भाकरी खाण्याची प्रथा आहे.
चविष्ट असण्यासोबतच या भाजीचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत.