हिरवी चटणी बनवताना वापरा 'हा' पदार्थ, आठवडाभर टिकेल, चवही बदलणार नाही

इडली, डोसासोबत हिरवी चटणी असेल तर त्याचा स्वाद दुप्पटीने वाढतो. पण कधीकधी चटणी बनवल्यानंतर ती एका दिवसात खराब होते.

हिरवी चटणी बनवताना हा एक पदार्थ वापरल्यास आठवडाभर टिकेल. तसंच, स्वादही टिकून राहिल.

साहित्य

कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, एक वाटी ओलं खोबरं, मीठ, आलं, लसणाच्या पाकण्या, तेल, पाणी

कृती

हिरवी चटणी बनवताना सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, ओलं खोबरं, आल्याचा तुकडा, लसूण आणि चवीनुसार मीठ टाका.

सर्व साहित्य टाकल्यानंतर चटणी वाटण्यापूर्वी त्यात अर्धा चमचा तेल टाका.

चटणीत तेल टाकल्यामुळं चटणी जास्त दिवस टिकते तसंच, तिची चवही चिकून राहते.

जर तुम्हाला ओलसर चटणी हवी असेल तर चटणी वाटताना त्यात थोडे पाणी टाका

VIEW ALL

Read Next Story