यूएईमध्ये अंडर-19 एशिया कप क्रिकेट स्पर्धा खेळवली जात आहे. यात भारतासह आठ संघांनी सहभाग घेतला आहे.

अंडर-19 एशिया कप स्पर्धेतील पाचवा सामना रविवारी भारत-पाकिस्तानदरम्यान खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानने 8 विकेटने विजय मिळवला

टीम इंडियाने 9 विकेट गमावत 259 धावा केल्या. विजयाचं आव्हान पाकिस्तानने 47 व्या षटकात दोन विकेट गमावत सहज पार केलं.

या सामन्यात क्रिकेट इतिहासातील सर्वात अजब घटना घडली. पाकिस्तान विकेटकिपरने चक्क पायाने झेल टिपला

पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अराफात मिन्हासने टाकलेल्या चेंडूवर आदर्श सिंहने फटका मारण्यााच प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कडा घेऊन विकेटकिपरच्या पायात जाऊन अडकला.

त्यानंतर विकेटकिपर बेगने गोल्व्हस काढून चेंडू हाताने पकडला आणि बादची अपील केली. अंपायरने आदर्श सिंहला आऊट घोषित केलं.

या सामन्यात पाकिस्तानचा स्टार फलंदाज अजान आवेशने 130 चेंडूत 105 धावा केल्या. त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' घोषित करण्यात आलं.

VIEW ALL

Read Next Story