वर्षातील पहिला सण अर्थात मकर संक्रांत १४ जानेवारी रोजी साजरा केला जात आहे.
या सणाला आवर्जून काळी साडी नेसली जाते. या साडीवर ट्रेंडी ब्लाऊज हवे असतील तर आम्ही तुमच्यासाठी पॅटर्न्स घेऊन आलो आहोत.
बोट नेकलाईनचा ब्लाऊज अगदी कोणत्याही साडीवर शोभून दिसेल. ही स्टाईल आवर्जून ट्राय करा.
तुम्ही रेगुलर गोलाकार नेकलाईनसोडून छान चौकोनी नेकलाईनचा ब्लाऊज घालू शकता.
काळ्या साडीवर सुंदर मल्टीकलर ब्लाऊज खूप उठून दिसेल आणि तुम्हाला हटके लूक देईल.
जर तुम्हाला जास्त स्किन दिसलेली आवडत नसेल तर तुम्ही हाय कॉलर ब्लाऊज घालू शकता.
तुम्ही प्लेन साडी नेसणार असाल तर तुम्ही डिझायनर नेट ब्लाऊज घालू शकता. हा ब्लाऊज हटके लूक देईल.
स्लिव्हलेस ब्लाऊज हा एक उत्तम पर्याय आहे. काटा पदराच्या साडीवर हा ब्लाऊज छान दिसेल.