14 जानेवारी रोजी मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजेच 13 जानेवारी रोजी भोगी साजरी केली जाते.
भोगीच्या सणाला घरोघरी मिक्स भाजी करण्याची परंपरा आहे, ज्याला भोगीची भाजी असे म्हणतात. तेव्हा भोगीची भाजी खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.
भोगीच्या भाजीमध्ये प्रामुख्याने घेवडा, हरभरा, तुरीच्या शेंगा, लाल गाजर, मुळा इत्यादी भाज्यांचा समावेश असतो. या भाजीमध्ये तीळ, शेंगदाणे, खोबरं आणि खसखस असे उष्ण पदार्थांचा समावेश केला जातो. तसेच संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी आणि तीळ लावलेली भाकरी असा बेत असतो.
भोगीच्या भाजीला समृद्ध आहार मानले जाते. याच्या सेवनाने संधिवात, हृदयरोग, स्ट्रोक, स्मृतिभ्रंश, कर्करोगापासून वाचवण्यास मदत होते, तसेच शरीरातील वृद्धत्वाची हळू होते.
भोगीच्या भाजीमध्ये फोलेट, ओमेगा-3 फॅट्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि ग्लूटाथिओन हंसी जीवनसत्वे असतात.
भोगीच्या भाजी खाल्ल्याने पचनक्रिया निरोगी राहते तसेच गॅस आणि पोट फुगणे या समस्या कमी होतात.
भोगीच्या भाजीमध्ये जीवनसत्व आणि खनिजांचा चांगला स्रोत असल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली होण्यास मदत होते.
भोगीच्या भाजीमध्ये हिरवे वाटणे आणि गाजर टाकले जातात, यापैकी वाटाणे व्हिटॅमिन सी चे तर गाजर व्हिटॅमिन ई चा स्रोत आहे.
बीन्समध्ये मँगनीज आणि खनिजांचा चांगला स्रोत असतो ज्यामुळे तुमची हाडे निरोगी राहतात. ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिस टाळण्यास मदत होते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)