कुकरची शिट्टी होताना त्यातून पाणी किंवा वरण बाहेर येताच अनेकदा संपूर्ण शेगडी आणि किचनचा बहुतांश भाग खराब होतो.
परिणामी प्रेशर कुकर वापरताना अनेकजण बरीच काळजी घेताना दिसतात. पण, हे नेमकं का होतं माहितीये?
कुकरचा रबर गॅस्केट सैल झाल्याच ही समस्या उदभवू शकते. त्याशिवाय अन्नपदार्थ शिजवताना प्रेशर कुकर ओव्हरफ्लो केल्यास त्यातून पाणी बाहेर येतं.
प्रेशर कुकरच्या वेट पाईपमध्ये एखादी गोष्ट अडकल्यास किंवा कुकरचं झाकण व्यवस्थित न बसल्यासही शिट्टी होताच पाण्याचा फवारा बाहेर येतो.
या समस्येवर तोडगा म्हणजे कुकरमध्ये जेवण करताना त्यात जास्त पाणी मिसळू नका. पाण्याती पातळी अर्ध्याहून जास्त ठेवा, जेणेकरून कुकरमध्ये अपेक्षित प्रेशर तयार होईल.
कुकरची क्षमता आहे तितकेच पदार्थ त्यात शिजवा. कुकर नेहमी स्वच्छ ठेवा. याशिवाय कुकरचं झाकण लावताना ते कायमच व्यवस्थित लागलं आहे की नाही याची काळजी घ्या.