व्हाट्सअप जगात सगळ्यात जास्त वापरला जाणारा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. 180 देशांमध्ये व्हाट्सअप वापरले जाते आणि या प्लॅटफॉर्मवर 2.78 अब्ज अॅक्टिव यूजर्स आहेत.
व्हाट्सअप स्कॅमर्ससाठी सुद्धा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. ते अनेक प्रकारे लोकांना इथे टार्गेट करू शकतात. अशाच एका प्रकारा बद्दल जाणून घेऊया.
याचा एक प्रकार सोशल इंजीनियरिंग आहे. यात स्कॅमर तुम्हाला बोलण्यात व्यस्थ करून तुमचे व्हाट्सअप अकाउंट हॅक करतात.
स्कॅमर लोकांना टार्गेट करून व्हेरिफिकेशन कोड किंवा पासवर्ड मिळवतात. यानंतर त्यांना अकाउंटचा अॅक्सेस मिळतो.
हॅकर्स सगळ्यात पहिले मोबाईल नंबरवरून व्हाट्सअपला रजिस्टर करतात. यासाठी त्यांना फक्त तुमच्या मोबाईल नंबरची गरज असते.
त्यांनी व्हाट्सअपला लॉगीन केलं की लगेच रजिस्टर्ड मोबाईल नंबरलर एक व्हेरिफिकेशन कोड येतो. आणि हा कोड मिळवण्यासाठी हॅकर्स वेगवेगळे प्रयत्न करतात.
मग आधी तुम्हाला ते कॉल करून कोणत्या तरी सर्विस बद्दल बोलतात. आम्ही बॅंकेतून किंवा टेलीकॉम सर्विस प्रोव्हायडर म्हणून बोलत असल्याचे सांगून ते तुमच्याशी बोलतात.
यानंतर ते कसं ही करून तुमच्याकडून व्हेरिफिकेशन कोड मिळवतात. जर तुम्ही हा कोड त्यांना दिलात तर तुमच्या अकाउंटचा अॅक्सेस त्यांना मिळतो.
जर तुम्हाला व्हाट्सअप व्हेरिफिकेशन कोडच्या नावाने कोणताही मेसेज आला, तर तो कोड कोणालाही देऊ नका.