भारताचा स्टार ऑल राउंडर रवींद्र जडेजा हा भारतीय जनता पक्षाचा सदस्य बनला आहे. यापूर्वी जगभरातील अनेक क्रिकेटर्सनी राजकारणात आपलं नशीब आजमावल. यात काही जण हिट ठरले तर काही फ्लॉप.
तेव्हा क्रिकेटनंतर राजकारणात सुद्धा हिट ठरलेल्या क्रिकेटर्सबद्दल जाणून घेऊयात.
भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर याला क्रिकेटनंतर राजकारणात देखील यश मिळाले. गौतम गंभीर 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडणूक आला होता.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर इम्रान खान याने क्रिकेटनंतर राजकारणात एंट्री घेतली. इम्रानच्या नेतृत्वात पाकिस्तानने वर्ल्ड कप जिंकला होता. इम्रान खानने राजकारणात नुसती एंट्रीच केली नाही तर पाकिस्तानचं सर्वोच्च पंतप्रधान पद देखील भूषवले.
टीम इंडियाचे माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांनी देखील क्रिकेटनंतर राजकारणाची वाट पकडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009 मध्ये ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून देखील गेले होते.
माजी क्रिकेटर नवजोत सिंह सिद्धूने भारताकडून 51 टेस्ट, आणि 136 वनडे सामने खेळले आहेत. 2004 साली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. परंतु त्यांनी 2016 मध्ये पक्षात काही मतभेद झाल्याने भाजपाची साथ सोडून काँग्रेसची वाट पकडली. ते पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष देखील होते. तसेच ते राज्य सभेचे माजी सदस्य सुद्धा आहेत.
अर्जुन रणतुंगा हे श्रीलंकेचे माजी क्रिकेटर असून ते राजकारणात सुद्धा यशस्वी ठरले. अर्जुन रणतुंगा हे श्रीलंकेचे माजी मंत्री सुद्धा आहेत. त्यांनी पदावर असताना परिवहन आणि नागरी वाहतूक मंत्रालयाचे प्रमुख होते.
भारताचा माजी क्रिकेटर युसूफ पठाण याची क्रिकेट कारकीर्द फार उल्लेखनीय ठरली. तो 2011 च्या वर्ल्ड कप संघाचा भाग होता. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर त्याने राजकारणात एंट्री केली. युसूफ पठाण याने 2024 लोकभा निवडणूक तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर लढली, यात तो विजयी झाला.
सनथ जयसूर्या हा श्रीलंकेचा माजी कर्णधार असून त्याला वनडे क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या आतापर्यंतच्या महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखले जाते. सनथ जयसूर्या हा सुद्धा श्रीलंकेच्या संसदेचा माजी सदस्य आहे.
मनोज तिवारी हा भारताचा माजी क्रिकेटर असून 2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मनोज तिवारी यांनी तृणमूल काँग्रेसकडून शिबपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. ते सध्या पश्चिम बंगाल सरकारमध्ये क्रीडा मंत्री आहेत.
कीर्ती आझाद हे भारताचे माजी क्रिकेटर असून त्यांनी क्रिकेट सोडल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. ते भारतीय जनता पक्षाकडून दरभंगा मतदारसंघातून तीन वेळा खासदार झाले. सध्या ते तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत.
भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंहने 2021 रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलो. हरभजन सिंह प्रत्यक्ष निवडणुकीत उतरला नसला तरी तो सध्या आम आदमी पक्षाकडून राज्यसभेचा खासदार आहे.