प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि त्यांची जीवनशैली व्यक्तिमत्त्वाविषयी खूप काही सांगून जाते.
नखांचा आकारही व्यक्तिमत्त्वाविषयी खूप काही सांगून जातो. नखं लंबवर्तुळाकार आणि पांढरीशुभ्र असल्यास ही व्यक्ती काहीशी गर्विष्ठ असते.
काहीशी कुरतडलेली, हलक्या निळसर रंगांची नखं असणारी मंडळी अनेकदा स्वत:च अडचणींशी झुंज देत असतात.
लहानशी नखं असणारे आणि नखं कुरतडणारे लोक खूप विचार करणाऱ्यांपैकी असतात.
काहींची नखं तुटलेली, अस्वच्छ असतात. अशी मंडळी कायम समजायला कठीण असतात.
चौकोनी आकाराची नखं असणारी मंडळी प्रामाणिक असतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)