पावसाळ्यात कपड्यांना कुबट वास येत आहे ? करा 'हे' उपाय

उन्हाळ्यात गरमीने वैतागल्यावर सर्वांनाच पावसाळा हवाहवासा वाटतो.पण हाच पावसाळा आला की अनेक समस्यादेखील घेऊन येतो.

पावसाळ्यात थंड वातावरणामुळे कपडे लवकर सुकत नाहीत त्यामुळे कपड्यांना कुबट वास येतो.

अशा वेळी हे घरगुती उपाय नक्की ट्रुाय करा.

कपडे साचवून ठेवू नये

बऱ्याच वेळा कपडे साचवून ठेवले जातात पण त्यामुळे कपड्यांना वास येतो जो कपडे धुतल्यानंतरही जात नाही.यामुळे ओले आणि सुके कपडे एकत्र ठेवणे टाळावेत.

लिंबाचा वापर

लिंबामध्ये अ‍ॅसिडिक गुणधर्म असतात जे दुर्गंध घालवण्यास मदत करतात. कपड्यांवर लिंबाचा रस टाकून कपडे भिजवून ठेवावेत यामुळे वास नाहिसा होतो.

सुगंधित साबण

पावसाळ्यात कपडे धुवताना सुगंधित साबणांचा वापर करावा ज्यामुळे कपड्याना चांगला सुगंध येतो व प्रसन्न वाटते.

व्हिनेगर \ बेकिंग सोडा

स्वयंपाक घरात वापरला जाणारा व्हिनेगर देखील कुबट वासाची समस्या दूर करते. यातील आम्ल गुणधर्म दुर्गंध निर्माण करणारे जिवाणू नष्ट करतात. तसेच बेकिंग सोडामध्ये कपडे भिजवून ठेवल्याने कुबट वास येत नाही.

सिलिकॉन पाऊचचा वापर

पावसळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्याने कपडे सुकवण्यासाठी फार वेळ लागते. अशा वेळा ओल्या कपड्यांच्या घड्या घालू नये त्यामुळे वास येतो. ज्या ठिकाणी सुकलेले कपडे ठेवले जातात तिेथे सिलिकॉन पाऊचचा वापर करावा यामुळे कपड्यांना वास येत नाही.

VIEW ALL

Read Next Story