उकाड्यात एसीचा सर्वाधिक वापर केला जातो. पण एसीचा वापर करताना त्याचं तापमान नेमकं किती ठेवावं? असा प्रश्न अनेकांना सतावत असतो.
एसीचा वापर करताना गारेगार वाराही मिळेल आणि वीजबिलही कमी येणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
त्यामुळे एसीचं तापमान किती असावं हे पूर्णपणे तुमच्या गरजेवर अवलंबून असतं.
सरकारने आपल्या अॅडव्हायजरीमध्ये 24 डिग्री सेल्सिअस हे डिफॉल्ट टेम्परेचर असावं असं सांगितलं आहे. सरकारने BEE सोबत मिळून हा सल्ला दिला होता.
यानुसार एसीचं डिफॉल्ट टेम्परेचर 24 डिग्री सेल्सिअस असतं. एसी वापरत असल्यास तुम्हाला हे जाणवत असेल. तुम्ही या तापमानावर एसीचा वापर केल्यास सर्वोत्तम आहे.
या तापमानावर एसी वापरल्यास तुम्हाला जास्त थंडीही लागणार नाही आणि जास्त वीज बिलही येणार नाही. पण अनेकांना कमी तापमान असल्यास रुम लवकर थंड होते असं वाटतं.
जर तुम्हीही एसीचं तापमान फार कमी ठेवत असाल तर एसीला फार मेहनत घ्यावी लागते. यामुळे विजेचं बिलही वाढतं.
तुम्ही रात्रभर 24 किंवा 25 डिग्रीवर एसीचा वापर करु शकता. यामुळे विजेचा वापरही कमी होईल आणि कुलिंगही चांगली मिळेल.
एसीचा वापर करताना तुमच्या खोलीचा दरवाजा किंवा खिडक्या उघड्या नाहीत याची काळजी घ्या. कारण या स्थितीत एसीला सतत कुलिंग करत राहावं लागतं.