मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू किंवा वड्या केले जातात. थंडीच्या दिवसात शरीरासाठी तीळ फायदेशीर मानले जातात.
संक्रांतीला तिळापासून विविध पदार्थ केले जातात. आज आपण तिळाचे लाडू आणि वड्या व्यतिरिक्त एक हटके पदार्थ पाहूयात.
नारळाच्या दुधातील तिळाची खीर कशी करायची याची रेसिपी आज पाहूयात.
नारळाचे घट्ट दुध, 1/4 कप नारळाचे पाणी, 1/4 कप तिळकुट, 2 टेबलस्पून भाजलेले तीळ, 2 टेबलस्पून किसलेला गुळ, 1/4 टिस्पून वेलची पुड, 2 टेबलस्पुन खवलेला नारळ, 1 टिस्पून बदाम, पिस्ता काप
सर्वप्रथम पांढरे तीळ कढाईत भाजून घ्या. तीळ चांगले भाजल्यानंतर ते एका भांड्यात काढून ठेवा
त्यानंतर दुसऱ्या भांड्यात नारळाचे दूध घेऊन ते मध्यम आचेवर गरम करत ठेवा. त्यानंतर भाजलेले तीळ आणि बाकीचे पदार्थ टाका.
सर्व मिश्रण घातल्यानंतर 5-7 मिनिटे शिजवून घ्या. नंतर खीरमध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाका
10 मिनिटांत तुमची तिळाची खीर तयार असेल.