महाराष्ट्र की राजस्थान? कोणत्या राज्यात सर्वात जास्त किल्ले?

काही संकेतस्थळावरील माहतीनुसार सर्वाधिक किल्ल्यांमध्ये कर्नाटक राज्याचा देशात तिसरा क्रमांक लागतो. कर्नाटक राज्यात एकूण 83 किल्ले आहेत.

त्यानंतर राजस्थान राज्याचा देशात दूसरा क्रमांक लागतो. राजस्थानमध्ये एकूण 105 किल्ले आहेत.

सर्वाधिक किल्ल्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्रामध्ये एकूण 4oo हून अधिक किल्ले आहेत. त्यात मुंबईतही 11 किल्ले आहेत.

महाराष्ट्रामध्ये पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सतारा या जिल्ह्यात सर्वाधिक किल्ले आहेत.

महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा इतिहास लाभला आहे. शिवाजी महाराजांनी एकून 1०० पेक्षा आधिक किल्ले बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच 49 किल्ल्यांची डागडुजी करुन त्यात काही बदल केले होते.

महाराष्ट्रातील गडकिल्यांना भेट देण्यासाठी हजारो लोक जात असतात. जगभरातील तरुण मंडळी देखील गडकिल्ल्यांना भेट देतात.

भारतातील मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, पंजाब, गोवा या राज्यामंध्ये देखील अनेक किल्ले आहेत.

VIEW ALL

Read Next Story