नवीन वर्षात हवीय सडपातळ कंबर व सपाट पोट? मग हे फॉलो करा

Dec 30,2023


हिवाळ्यात आळशीपणामुळे अनेकदा शारीरिक हालचाल कमी होते. परिणामी या ऋतूमध्ये वजन वाढू लागते, ज्यावर नियंत्रण ठेवणे खूप कठीण असते. या ऋतूमध्ये बहुतेक लोक लठ्ठपणाचे शिकार होतात, त्यामुळे त्यांचे वजन नियंत्रणात ठेवणे कठीण होते.


तसेच, थंडीच्या वातावरणात बाहेर व्यायाम करणे आणि जिममध्ये जाणे खूप कठीण होते. जर तुम्हाला या दिवसांमध्ये घर बसल्या बारीक होयाच असेल तर तुम्ही हे सूप ट्राय करू शकता.

मिक्स सूप

पालक, ब्रोकोली, गाजर, बीटरूट, टोमॅटो, शिमला मिरची, कोबी, आले यांचे मिक्स सूप अनेक खनिजे आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे. याशिवाय, त्यात फायबर, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जीवनसत्त्वे, प्रथिने आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे हिवाळ्यात आपला वजन कमी करण्यास मदत मिळेल.

चिकन सूप

चिकनमध्ये प्रथिने भरपूर असली तरी वजन कमी करण्यात ते खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. हे सूप प्यायल्याने आपल्या शरीराला प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स मिळतात. यात कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे आपल्याला भूक लागत नाही.

टोमॅटो सूप

टोमॅटोमध्ये अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वे असतात, जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. हे प्यायल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.

गाजर आणि बीट सूप

बीटा कॅरोटीन युक्त गाजर आणि आयर्न समृद्ध बीटरूटपासून बनवलेले सूप आपल्या शरीराचा आकार तर उत्तमच बनवते पण आपल्याला शरीरात रक्त प्रवाह नियंत्रीत ठेवते, ज्यामुळे आपल्याला नेहमी ऊर्जा मिळते.

VIEW ALL

Read Next Story