अनेकांसाठी प्राणी हा जिव्हाळ्याचा विषय असतो. यापैकी कित्येकांना कुत्रा आणि मांजर पाळणं खूपच आवडते.
बऱ्याच जणांना विशेष जातीच्या मांजरी पाळायला अत्यंत आवडते. जगभरात हजारो जातीच्या मांजरी असतात. त्यापैकी पार्शियन जातीच्या मांजरी या मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात.
पार्शियन मांजरी खूपच सुंदर दिसतात आणि याच कारणामुळे बरेच लोक या जातीच्या मांजरी पाळणं पसंत करतात.
सुंदरतेमुळे लोक पार्शियन मांजर विकत घेण्यासाठी लाखो रुपये मोजतात.
परंतु, या जातीच्या मांजरी इतक्या महाग असण्यामागचं नेमकं काय कारण आहे? जाणून घेऊयात सविस्तर
खरंतर, पार्शियन ही मांजरींच्या शाही जातींपैकी एक मानली जाते. शाही जातीमुळेच या मांजरी अत्यंत महाग मानल्या जातात.
या व्यतिरिक्त, पार्शियन मांजरींचे डोळे खूपच सुंदर असतात. यामुळेच त्या अधिक आकर्षक वाटतात.
पार्शियन जातीच्या मांजरींची खास काळजी घेतली जाते. मादा पार्शियन मांजरीची किंमत ही नर मांजराच्या किंमतीपेक्षा अधिक असते.
टीप- इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. ZEE 24 Taas याची पुष्टी करत नाही.