डोसा बनवायचं म्हटलं की किमान 12 तास आधी डाळ-तांदुळ भिजवावे लागतात. त्यानंतर पीठ आणखी काही काळ आंबवावे लागते.
मात्र आज आम्ही तुम्हाला डाळ-तांदुळ न भिजवता व पीठ न आंबवता लगेचच डोसा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.
तांदूळ, १/४ कप उडीद डाळ, १/४ कप पोहे ,१/४ चमचा मेथीदाणे, एका लिंबाचा रस, १/२ चमचा साखर,चवीनुसार मीठ,१ चमचा इनो फ्रुट सॉल्ट, तेल
सगळ्यात पहिले एका भांड्यात तांदुळ, उडदाची डाळ, पोहे, मेथीचे दाणे हे सर्व साहित्य एकत्र करुन चांगले 3 ते 4वेळा धुवून घ्या
त्यानंतर हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घ्या. नंतर यात लिंबाचा रस, साखर आणि गरजेप्रमाणे पाणी टाकून चांगलं बारीक करुन घ्या.
आता हे डोशाचे पीठ एका भांड्यात घेवून त्यात चवीनुसार मीठ, इनो टाका. आता तुमचे डोशाचे बॅटर तयार आहे.
आता तवा कडकडित गरम झाल्यावर डोसे काढायला घ्या