आयसीसी टी 20 वर्ल्डकपच्या आधी वेस्ट इंडिजचा संघ तुफान फॉर्मात दिसतोय.


वेस्ट इंडिजने टी 20 सिरिजमध्ये साऊथ आफ्रिकेला 3-0 अशी मात दिली.


आता वेस्ट इंडिजने प्रॅक्टीस मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला 35 रन्सने हरवलं.


पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याचा निकोलस पूरन हिरो ठरला.


डावखुऱ्या फलंदाजाने 25 बॉल्समध्ये 75 रन्स केले. ज्यामध्ये 8 सिक्स आणि 5 फोर होते.


निकोलस पूरन आयपीएलमध्ये लखनौ सुपर जाएंट्सकडून खेळला.


वेस्ट इंडिजने 4 विकेट्सच्या बदल्यात 257 रन्स केले होते.


याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाकडून जोश इंगलिसने 55 रन्सची खेळी केली. तरी 7 विकेट्सच्या बदल्यात ते 222 रन्सच करु शकले.

VIEW ALL

Read Next Story