घरच्या घरी करा साउथ इंडियन स्टाइल मँगो राईस

मँगो राइस

रोज रोज डाळ-भात किंवा चपाती-भाजी खाऊन कंटाळलात असाल तर आता हा मँगो राईस ट्राय करुन पाहा. कमी साहित्य आणि झटपट होणारा हा मँगो राइस मुलांपासून मोठ्यांनाही आवडेल.

कृती

सगळ्यात पहिले एका भांड्यात बासमती तांदळाचा भात शिजवून घ्या. भात अर्धा-कच्चा शिजवून घ्या.

त्यानंतर एक मध्यम आकाराची कैरी चांगली किसून घ्या.

एका पॅनमध्ये तेल टाकून ते गरम झाल्यावर त्याच मोहरी, जिऱ्याची फोडणी द्या. नंतर कडीपत्ता, हिरवी मिरची, हिंग टाकून चांगले एकजीव करा.

आता त्यात कैरीचा किस टाका आणि चांगले एकत्र करुन घ्याआता यात शिजवलेला भात टाकून चांगली वाफ काढून घ्या

आता तुमचा मँगो राइस खाण्यासाठी तयार आहे.

VIEW ALL

Read Next Story