वजन कमी करण्यासाठी सकाळी काय प्यावे?

आजच्या वाईट जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे वजन वाढणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे.

वजन वाढीमुळे अनेक आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. मग अशावेळी वजन कमी करण्यासाठी सकाळी काय प्यावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याच आज उत्तर घेऊन आलो आहोत.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते काही घरगुती पेये आणि व्यायाम याची जोड असेल तर तुमचं वजन कमी होऊ शकतं.

आहार तज्ज्ञांनुसार धन्याच पाणी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. धन्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं.

रोज रात्री झोपण्यापूर्वी 3 चमचे धणे एका ग्लास पाण्यात भिजवा. हे पाणी सकाळी उठल्यावर रिकाम्या पाटी गाळून प्या. याच्या जोडीला व्यायाम केल्यास फायदा मिळतो.

या धणे पाण्याचा सेवनाने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळतं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story