कलिंगडमध्ये 92 टक्के पाणी असतं त्यामुळे उन्हाळ्यात हे फळ खाल्यानं तुम्ही हायड्रेटेड राहू शकतात. त्याशिवाय तुमची त्वचा देखील चांगली होते.
आंबा हा फळांचा राजा आंबा यात व्हिटामिन्स, फायबर आणि पोटॅशियम असतं. त्यामुळे पचनक्रिया चांगली होते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी देखील आंबा फायदेकारक आहे.
मोसंबी हे फळ उन्हाळ्यात खूप फायदेकारक ठरतं. त्यात असलेलं व्हिटामिन सी, पोटॅशियम आणि फायबर तुमची इम्यूनीटी सिस्टम चांगली करतात आणि पाचन क्रिया सुधारता.
पपईत व्हिटामिन्स ए, सी आणि ई, फायबर आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतात. हे पचन क्रिया किंवा इम्यूनिटी सिस्टीम चांगली करतं.
डाळिंबमध्ये अॅन्टिऑस्कीडंट मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो आणि कॅन्सरसारख्या आजाराची शक्यता देखील कमी होते.
खरबूजमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, त्याशिवाय त्यात व्हिटामिन ए, सी आणि पोटॅशियम असतं. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)