लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आपली संपत्ती निवडणूक आयोगाकडे जाहीर करतात.
पहिल्या टप्प्यातील उमेदवारीच्या माहितीनुसार देशभरात कोण सर्वाधिक उमेदवार आहेत? त्यांच्याकडे किती संपत्ती आहे,याची माहिती समोर आली आहे.
कॉंग्रेस उमेदवार नकुलनाथ यांच्याकडे एकूण 716 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पहिल्या टप्प्यातील सर्व उमेदवारांपेक्षा ही जास्त आहे.
देवनाथ हे तामिळनाडूतील शिवगंगा लोकसभा जागेवरुन भाजप उमेदवार आहेत. त्यांच्याकडे 304 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
रिपोर्टनुसार असोशिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्मचे उमेदवार के.अशोककुमार यांच्याकडे 662 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
उत्तराखंड येथील तिहरी गढवालच्या भाजप उमेदवार माला शाह यांच्याकडे 207 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
देवबंद येथे बीएसपीच्या जागेवरुन माजिद अली निवडणूक लढवतायत. पहिल्या टप्प्यात त्यांच्याकडे जास्त म्हणजे 159 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
तामिळनाडूच्या वेल्लोरचे भाजप उमेदवार एसी षणमुगम यांच्याकडे 152 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांचे नाव या यादीत सहाव्या स्थानी आहे.