कांदा खाल्यानंतर आपल्या तोंडातून वास येऊ लागतो त्यानंतर जर तुम्ही पार्सले खालं तर तोंडाचा वास दूर होतो.
मध्यकाळाता कांद्याचा वापर करेंसीच्या रुपात करण्यात येत होता. देवाण-घेवाणात किंवा भाडं देताना याचा वापर करण्यात यायचा.
कांद्या खाल्यानं तुमच्या डोळ्यातून पाणी येण्याचं कारण त्यात असलेलं सल्फ्यूरिक अॅसिड आहे, ते डोळ्यात गेल्यानंतर अश्रू येतात.
कापलेला कांदा जर तुम्ही कीडे चावल्याच्या ठिकाणी किंवा जळजळ होत असलेल्या ठिकाणी लावलं तर नक्कीच फायदा होतो.
सगळ्यात मोठा कांदा हा 2023 मध्ये इंग्लंडमध्ये आला होता. त्याचं वजन 8.97 किलोग्राम होतं.
कांदा तीन रंगात असतो, त्यात लाल, पांढरा आणि पिवळा हा प्रकार आहे.
कांद्याविषयी न माहित असलेल्या गोष्टी वाचून नक्कीच तुम्हालाही आश्चर्य झाले असेल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)