मुलायम, चमकदार आणि तेजस्वी त्वचा प्रत्येकालाच हवी हवी असते. बदलेले वातावरण आणि लाइफस्टाइचा परिणाम आपल्या त्वचेवर पडतो. उन्हामुळे आपल्या त्वचा शेडी आणि पिगमेंटेड होत जात असते. अशावेळी घरच्या घरी डी-टॅनिंगचे 5 घरगुती उपाय सांगणार आहोत.
लिंबाचा रस एक नॅचरल ब्लीचींग एजंट असल्याने हा सन टॅनला दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी ताज्या लिंबाचा रस घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मध मिस्क करा. 20-30 मिनिटांपर्यंत तो धुवून टाका.
बेसन, दही आणि हळदीची पेस्ट चेहऱ्याला लावा. साधारण 15 मिनिटांनी हलक्या हाताने स्क्रब करुन धुवून टाका.
पिकलेला पपई, टरबूज, बटाटा, टोमॅटो आणि काकडीचे 4-5 क्यूब घ्या आणि जेलीसारखी पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट 15 मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. आता ही पेस्ट त्वचेला लावून मालिश करा.
मसूरची डाळ रात्रभर कच्च्या दुधामध्ये भिजत ठेवा. आता ही डाळ्यात हळदी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर थंड पाण्याने धुवून टाका.
कॉफी पावडर, खोबरेल तेल आणि साखरेची दाट पेस्ट तयार का. या पेस्टने 10 मिनिटांपर्यंत स्क्रब करा आणि 10 मिनिटांनी धुवून टाका. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)