काजळ ही सौंदर्यप्रसाधनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट मानली जाते. यामुळं डोळ्याचे सौंदर्य वाढवण्यास मदत होते.
महागडे काजळ घेण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीही काजळ तयार करु शकता
काजळ बनवण्यासाठी बदाम, कापूस, तीळाचे तेल, दिवा यागोष्टींची गरज आहे
सर्वात पहिले बदाम सुकवून ते बारीक करुन घ्या. त्याची चांगली पावडर बनवा
आता कापसात बदामाची पावडर टाकून त्याची वात तयार करुन ती मातीच्या दिव्यात लावून घ्या. आता त्या दिव्यात तीळाचे तेल टाका
आता दिव्याच्या वर एक स्टीलचे ताट ठेवून दिवा पेटवा. आता ताटावर जी काजळी निर्माण होईल ती काढून एका भांड्यात काढा
आता त्यात साजूक तूप मिसळा. तुमचे घरगुती काजळ तयार होईल.