चहा प्रेमी आपल्याला सगळीकडे भेटतात. त्यातही प्रत्येकाची चहा बनवण्याची पद्धत ही वेगळी असते इतकंच नाही तर त्यांच्या आवडीही वेगळ्या असतात.
सतत एकाच भांड्यात चहा बनवल्यानंतर ते भांड काळं होतं. तर ते कसे साफ करायचे ते जाणून घेऊया.
मीठानं तुम्ही हे काळे डाग घालवू शकतात. त्यासाठी मीठ आणि साबण एकत्र करा आणि मग ते भांड घासा.
बेकिंग सोडा चहाच्या काळ्या भांड्याला साफ करण्यास तुम्हाला मदत करेल. बेकिंग सोडा थेट स्क्रबरवर घ्या आणि ते भांड धूवा.
या दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्र करुनही चहाचं भांड घासू शकता आणि नक्कीच डाग जातील.
लिंबाचा रस तुम्हाला मदत करु शकते त्यासाठी त्या भांड्यात पाणी आणि लिंबाची एक फोड घाला. त्यानंतर ते पाणी उकळू द्या सगळे डाग नक्कीच जातील.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)