ग्रीन टी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. परंतु काहीजण ग्रीन टी पिण्याचा अतिरेक करतात ज्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
ग्रीन टीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स आणि भरपूर पोषकतत्व असतात, ज्यामुळे आरोग्य चांगलं राहत.
ग्रीन टी वजन कमी करण्यास करते. तसेच ओरल कॅन्सरचा धोका सुद्धा कमी होतो.
ग्रीन टी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते पोटाचे आजार दूर होतात.
डायबेटिजचा धोका टाळण्यासाठी सुद्धा लोक ग्रीन टीचे सेवन करू शकतात.
ग्रीन टी प्यायल्याने हृदय निरोगी राहते आणि शरीर ताजेतवाने वाटते.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते दिवसातून २ ते ३ कप ग्रीन टी पिणे योग्य ठरते.
ग्रीन टीमध्ये कॅफिन आढळते. तेव्हा जर दिवसभरात जास्तवेळा ग्रीन टीचे सेवन कराल तर निद्रानाश, चिडचिड, डोकेदुखी आणि हृदयाचे ठोके वाढणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)