पितृपक्षात एक नव्हे तर दोन ग्रहण; 18 सप्टेंबरपासून 'या' 3 राशींच्या अडचणीत होणार वाढ

Sep 16,2024


17 सप्टेंबरपासून पितृ पक्षाला सुरुवात होत आहे. पहिलं श्राद्ध 18 सप्टेंबरला असणार आहे. तर पितृपक्षाची सांगता 2 ऑक्टोबरला असणार आहे.


18 सप्टेंबरला पहिल्या श्राद्धाच्या दिवशी या वर्षांतील दुसरं चंद्रग्रहण असणार आहे. तर 2 ऑक्टोबरला श्राद्धाच्या शेवटच्या दिवशी सूर्यग्रहण आहे.


ज्योतिषशास्त्रानुसार पितृ पक्षातील चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे तीन राशींसाठी अत्यंत अशुभ असणार आहे. या लोकांनी काळजी घ्यावी.


कर्क - या लोकांना नोकरी आणि व्यवसायात नुकसान सहन करावं लागणार आहे. नात्याच तणाव किंवा मतभेद वाढणार आहे. वागण्यात चिडचिडेपणा असल्यास तुमचं नुकसान होईल.


आर्थिक घडी गडबडणार आहे. तुम्ही कर्जामुळे त्रस्त राहणार आहे. दुखापत आणि अपघात याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे.


तूळ - नोकरी आणि व्यवसायात अडथळे येणार आहे. नवीन नोकरी शोधण्यासाठी दबाव येणार आहे. वैवाहिक जीवनावरही परिणाम करणार असणार आहे. मुलांच्या बाजूने तुम्ही त्रस्त असणार आहे.


मकर - वडिलोपार्जित संपत्तीबाबत वाद होणार आहे. कर्ज देणे किंवा पैसे देणे टाळा. पैसा अडकण्याची दाट शक्यता आहे. तब्येतही बिघडू शकते.


अनावश्यक मानसिक ताण किंवा चिंता तुम्हाला घेरतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा खराब होण्याची भीती राहणार आहे. घरातील वडीलधाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story