आजकाल प्रत्येकाकडे वाहन आहे. त्यामुळे बहुतांश जणांचा पेट्रोलशी संबंध येतो.
पेट्रोलचे दर वाढतात तसा चालकांचा जीव वरखाली होत असतो.
जगभरातल्या सर्वाधिक गाड्या पेट्रोलवर चालतात. पेट्रोल हे जगातील विकले जाणारे तेल आहे.
प्रत्येक राज्यात टॅक्स आणि इतर शुल्क वेगळे असतात. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यात पेट्रोलचे दर वेगवेगळे असतात.
जगात सर्वात स्वस्त पेट्रोल वेनजुएलामध्ये मिळते. येथे एक लीटर पेट्रोल साधारण 2 रुपये दराने मिळते.
भारतात सर्वात महाग पेट्रोल आंध्र प्रदेश येथे मिळतं. येथे पेट्रोल 110 रुपये प्रती लीटर इतक्या दराने मिळते.
पण भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल कुठे मिळतं?
भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल अंदमान निकोबार दिप समुहात मिळतं.
भारतभरात पेट्रोल साधारणपणे 108 रुपये प्रती लीटर मिळते. तर अंदमान निकोबार येथे 82.42 रुपये प्रती लीटर दराने मिळते.