5 पांडवाकडून द्रौपदीला किती मुलं, जाणून घ्या त्यांची नावं

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Sep 03,2024

महाभारताबद्दल बोलताना कौरव, पांडवांसोबत द्रौपदीचा उल्लेखही अनेकदा केला जातो.

द्रौपदी ही राजा द्रुपद यांची कन्या होती. यांना पांचली, याज्ञसेनी आणि कृष्णा असं देखील संबोधलं जायचं.

द्रौपदी पाच पांडवांची पत्नी होती. अर्जुनाने तिला स्वयंवरात जिंकल होतं. पण नंतर कुंतीच्या सांगण्यावरु द्रौपदी पाच पांडवांची पत्नी झाली होती.

पांडवांकडून द्रौपदीला किती मुलं होती. त्यांची नावे काय? जाणून घेऊया

द्रौपदीला पाच पांडवांकडून पाच मुलं होती. यामध्ये युधिष्ठिरपासून जन्मलेल्या मुलाचं नाव प्रतिविन्ध्य असं होतं.

भीम आणि द्रौपदी यांच्या मुलाचं नाव सुतसोम.

अर्जुन आणि द्रौपदी यांच्या मुलाचं नाव ऋुतकर्मा

नकुल आणि द्रौपदी यांच्या मुलाचं नाव शतानिक

सहदेव आणि द्रौपदी यांच्या मुलाचं नाव श्रुतसेन

VIEW ALL

Read Next Story