कोबीची भाजी म्हटलं की मोठ्यांपासून लहानांपर्यंत नाक मुरडतात.
पण कोबीच्या भाजीत एक पदार्थ घालून केल्यास मुलंही आवडीने खातील
कोबी बारीक चिरलेला, कडिपत्ता, मोहरी, मिरच्या, जिरे, अर्धी वाटी दूध, मीठ, मटार, आलं.
सगळ्यात आधी एका भांड्यात तेल टाकून त्यात कडिपत्ता, मोहरी, जिरे, मिरची, आलं फोडणी द्या.
नंतर लगेचच बारीक चिरलेला कोबी आणि मीठ टाका. नंतर मटार टाका
आता एकदा भाजीला वाफ येऊ द्या. चांगली वाफ आल्यानंतर त्यात अर्धी वाटी दूध घाला आणि पुन्हा कोबी शिजेपर्यंत वाफ काढून घ्या
दूध टाकल्यामुळं कोबीच्या भाजीचा उग्र वास कमी होतो. तसंच, कोबी मऊदेखील होतो. त्यामुळं लहान मुलंही आवडीने भाजी खातात.