'हे' 5 पदार्थ ब्लड शुगर लेवल त्वरित करतात कमी

Apr 29,2024

विचीत्र लाईफस्टाईल

दिवसेंदिवस डायबिटीसच्या वाढत्या समस्येचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुमची विचीत्र लाईफस्टाईल. तुम्ही तुमच्या नियमित आहारात काही महत्त्वाच्या सिड्स आणि अन्य गोष्टींचा समावेश करू शकता. यासगळ्या सिड्स भरपूर पोषक तत्वांनी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि मधुमेहाची स्थिती वाढण्यापासून रोखण्यास मदत करतील

फ्लैक्स सीड्स

फ्लैक्स सीड्समध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असतं. फायबर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी राखते आणि डायबिटीस गंभीर होण्यापासून नियंत्रित करते.

चिया सीड्स

चिया सीड्स अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा ३ फॅटी ॲसिड, फायबर आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहेत. हे सगळे पोषक घटक डायबिटीसची शक्यता कमी करतात. तसंच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात. अशा स्थितीत जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होत असेल तर त्याचा आहारात नक्कीच समावेश करा. जर याचा तुमच्या आहारात समावेश नसल्यास, ते तुम्हाला प्रीडायबेटिसपासून वाचवू शकते.

नट्स

अनेक प्रकारचे ड्रायफ्रूट्स उपलब्ध आहेत, ते दररोज मर्यादित प्रमाणात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत होते. त्यामध्ये अनेक जीवनसत्त्वं आणि निरोगी फॅट्स असतात, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. एवढंच नाही तर ते आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगलं असतं.

दालचीनी

यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबायोटिक गुणधर्म असतात. हे इन्सुलिनचा प्रभाव कमी करून मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात. दालचिनीचा चहा प्यायल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते. दालचिनीचा चहा बनवण्यासाठी 1 कप पाण्यात 4-5 इंच दालचिनीचा तुकडा घाला आणि ते अर्धे होईपर्यंत उकळवा. चवीनुसार त्यात काही ग्रीन टी देखील टाकता येईल. ते कोमट असेपर्यंत प्यावे.

दही

दह्यात प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतं त्यामुळेच दही हाय ब्लड शूगर कमी करण्यास मदत करतं. डॉ. अंबरीश मिथल, अध्यक्ष, एंडोक्राइनोलॉजी आणि मधुमेह, मॅक्स हेल्थकेअर यांच्या मते, मधुमेही रुग्णांनी दररोज दही खावं, जेणेकरून रक्तातील साखर सामान्य राहते.

VIEW ALL

Read Next Story