ब्ल्यू झोनमधील लोक डेअररी प्रोडक्टपासून दूर राहतात आणि नाश्त्याला पॉपकॉर्न खाणं पसंत करतात. यामध्ये एंटीऑक्सिडेंट आणि फायबर असतं.
उकळून किंवा तळून हे खाऊ शकता. यामध्ये फॅट आणि कॅलरी कमी असतं. तसंच प्रोटीन, फायबर आणि आवश्यक विटॅमिन-मिनरल अधिक प्रमाणात असतात.
बिया ब्ल्यू झोनमधील लोकांचं मुख्य भोजन आहे. यामुळेच ते छोलेही स्नॅक्समध्ये खातात. ऑलिव्ह ऑइलमध्ये थोड्या प्रमाणात फ्राय केल्यानंतर जिरा, मिरची पावडर, लाल मिरची मिसळून खाऊ शकता.
ब्ल्यू झोनमधील लोक नाश्त्यात बदाम, शेंगदाणे, काजू, अक्रोड खाणं पसंत करतात. यामध्ये विटॅमिन आणि मिनरल्स असतात.
हे लोक नाश्त्यात फळांचाही समावेश करतात. तुम्हीदेखील नाश्त्यात सफरचंद, द्राक्ष, अननस अशा वेगवेगळ्या फळांचा समावेश करु शकता.