तुळस हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानली जाते.तिची पूजा केली जाते.
तुळशीच रोप नेहमी हिरवगार असाव अशी आपली इच्छा असते. पण आपल्या निष्काळजीपणामुळे या हे रोप सुकण्याची शक्यता असते.
तुळशीच रोप हिरवगार रहाव यासाठी काही खास उपाय.
दुपारच्या उन्हात तुळशीच्या रोपाला ठेवल्यास ते लवकर सुकत. त्यामुळे दुपारच्या वेळेत तुळशीच्या रोपाला सावलीत ठेवावं.
हिवाळ्यात तुळशीच्या रोपावर दवाचे थेंब पडल्यास ते लवकर कुजत.
तुळशीला पाणी घातल्यानंतर त्याचा योग्य निचरा होण अत्यंत आवश्यक आहे.
तुळशीला मंजिरी आल्या की त्याची वाढ खुंटते. तुळशीच्या मंजिरी कापल्यास त्यांची चांगली वाढ होते.
या उपायांचा वापर करून आपण तुळशीच्या रोपाला टवटवीत ठेऊ शकतो.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)