'या' ऋतूमध्ये योगसाधना सुरु केल्यास मिळेल फायदा, तज्ज्ञांचा सल्ला

Jun 20,2024


योग्य वेळ- तज्ज्ञांचा मते योग करण्याची योग्यवेळ ब्रह्म मुहूर्त. ब्रह्म मुहूर्त सकाळी 3:30-4 वाजता सुरू होतो तर सकाळी 6 ते 7 पर्यंतही योग करू शकतो. सकाळी उठल्यानंतर पोट साफ करून आपण योगासने सुरू करू शकतो.


काही लोकांना व्यग्र जीवनशैलीमुळे सकाळी योगासनं करणे शक्य नसते. अशा मंडळींनी सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत योगासनांसाठी वेळ द्यावा.


योगसाधनेसाठी वसंत ऋतू उत्तम आहे. मार्च-एप्रिलच्या दरम्यान तुम्ही योग सुरू केल्यास तुमच्या शरीराला योग करण्याची सवय होते आणि योग सराव बिघडण्याचा धोका कमी होतो.

योगासने करण्याआधी काय करावे?

योग करण्याआधी पोट साफ करणे आवश्यक आहे. योग करण्याआधी तुम्ही केळं खाऊ शकता. योगसाधना मोकळ्या हवेत करावी. बाहेर हवामान खराब असल्यास दरवाजे-खिडकी उघडून सराव करावा. एसी चालू ठेवून योगा करू नये. योग करताना सूती कपडे परीधान करावेत.

योगा करताना काय करावे ?

योगासने करताना योगावर लक्ष केंद्रित करावे. कोणत्याही आसनाचा सराव करताना 30 सेकंद ते 1मिनिटचा कालावधी असावा.

योगा कधी करू नये ?

सकाळी 9 नंतर योगा करणे टाळा. रात्रीच्या वेळीदेखील योगा करू नये.

योगानंतर काय करावे?

योगासनानंतर 10-15 मिनिटांनी पाणी प्यावे. योगानंतर कमीत कमी 30 मिनिटे काही खाऊ नये. योगा केल्यानंतर 30मिनिटांनंतरच अंघोळ करावी.

VIEW ALL

Read Next Story