'सांबा' साकारणाऱ्या मॅक मोहन यांना या भूमिकेसाठी 12 हजार रुपये इतकं मानधन मिळालं होतं.
'कालिया'ची भूमिका साकारणाऱ्या विजू खोटे यांना या भूमिकेसाठी 10 हजार रुपये मिळाले होते.
हेमा मालिनी यांनी साकारलेल्या 'बसंती'साठी 75 हजार रुपये इतकं मानधन देण्यात आलं होतं.
अभिनेत्री जया भादुरी बच्चन यांना 'शोले'साठी 35 हजार रुपये इतकं मानधन मिळालं होतं.
'शोले'साठी सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार म्हणजे, धर्मेंद्र. त्यांना या चित्रपटासाठी 1 लाख 50 हजार रुपये इतकं मानधन मिळालं होतं.
बिग बी अमिताभ बच्चन यांना 'शोले'तील भूमिकेसाठी 1 लाख रुपये इतकं मानधन मिळालं होतं.
अभिनेता संजीव कुमार यांनी या चित्रपटात 'ठाकूर'ची भूमिका साकारली असून, त्यासाठी त्यांना 1 लाख 25 हजार रुपये इतकं मानधन मिळालं होतं.
चित्रपटात 'गब्बर'च्या भूमिकेत दिसलेल्या अमजद खान यांना या भूमिकेसाठी 50 हजार रुपये इतकं मानधन मिळालं होतं.
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर है' असं म्हणत 'शोले'मध्ये झळकलेल्या अभिनेता असरानी यांना या भूमिकेसाठी 15 हजार रुपये इतकं मानधन मिळालं होतं.