तुम्ही शिजवलेला लसूण भाज्यांमधून नक्कीच खात असाल. पण कच्चा लसूण खाण्याचा फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?
कच्चा लसूण खाण्याचा थेट फायदा हृदयाला होतो असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होण्यास मदत होते.
कच्चा लसूण हा हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो.
लसणामध्ये एलिसिन नावाचं तत्व असतं जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं.
रक्त पातळ करण्याची क्षमता एलिसिनमध्ये असते. त्यामुळे रक्ताभिसरण संतुलित ठेवण्यासाठी फायदा होतो.
रिकाम्या पोटी सकाळी लसणाचं सेवन करतो तेव्हा आपण एलिसिनचं सेवन करतो.
लसूण शिजवून खाल्ल्याने एलिसिनचा प्रभाव कमी होतो म्हणून कच्चा लसूण खाणं अधिक फायद्याचं ठरतं.
लसणाचा उग्र वास येत असला तरी सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाणं हे आरोग्यासाठी फार फायद्याचं असतं.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी किंवा आहारात बदल करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.