भारतात मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केले जाते. लग्नातही सोनं दिलं जातं
दिवाळीच्या दिवसांत सोनं खरेदी करणं खूप शुभं मानलं जातं.
पण तुम्हाला माहितीये का नियमांनुसार, घरात किती सोनं ठेवू शकतो
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सेज (CBDT) च्या नियमांनुसार, तुम्ही एका मर्यादेपर्यंत घरात सोनं ठेवू शकता
CBDT नियमांनुसार, तुम्ही घरात कितीही सोनं ठेवू शकता. मात्र, तुमच्याकडे त्याचा पुरावा हवा. म्हणजेच सोनं खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आला याचा पुरावा हवा
लग्न झालेल्या महिला घरात 500 ग्रॅमपर्यंत सोनं ठेवू शकतात तर, अविवाहित महिला 250 ग्रॅम सोनं घरात ठेवू शकता
पुरुष 100 ग्रॅम सोनं बाळगू शकतात. तसंच, सोनं कुठून घेतलंय यांची पावती नेहमी जवळ बाळगावी. हा एक पुरावा असतो