धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर राशीनुसार करा 'या' गोष्टींची खरेदी, कधी नसणार पैशांची चणचण

नेहा चौधरी
Oct 29,2024

मेष

या लोकांनी सोने किंवा पितळेच्या वस्तू खरेदी कराव्यात. यामुळे आरोग्याच्या समस्या सुधारतील.

वृषभ

या लोकांनी धनत्रयोदशीला वाहन, कपाट किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी कराव्यात. यामुळे तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल.

मिथुन

या लोकांनी धनत्रयोदशीला पितळेची भांडी किंवा पितळेची मूर्ती खरेदी करावी. यामुळे तुमची निर्णय क्षमता सुधारेल.

कर्क

या लोकांनी धनत्रयोदशीला पितळ किंवा सोन्याच्या वस्तू खरेदी कराव्यात. यामुळे तुमच्या भावनिक समस्या सुधारतील.

सिंह

या लोकांनी धनत्रयोदशीला तांब्याचे भांडे खरेदी करावे, त्यातही पाण्याची भांडी असेल तर उत्तम. असे केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील.

कन्या

या लोकांनी धनत्रयोदशीच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करणे चांगले राहील. यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतील.


या लोकांसाठी धनत्रयोदशीच्या दिवशी देव किंवा देवीची मूर्ती खरेदी करणे चांगले. यामुळे तुमचं प्रलंबित काम पूर्ण होईल.


या लोकांनी चांदीचे नाणे किंवा चांदीचे भांडे खरेदी करणे खूप चांगले होईल. यामुळे कर्जाची स्थिती आणि पैशाची स्थिती सुधारेल.

धनु

या लोकांनी तांब्याचा दिवा किंवा तांब्याचे भांडे खरेदी करा. त्यामुळे करिअरमधील अडथळे दूर होतील.

मकर

या लोकांनी पितळेची मूर्ती किंवा भांडे खरेदी करा. त्यामुळे जीवनाचा संघर्ष कमी होईल.

कुंभ

या लोकांनी चांदीची भांडी, विशेषतः पाण्याची भांडी खरेदी करणे शुभ राहील. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.

मीन

या राशीच्या लोकांसाठी पाण्याने भरलेले तांब्याचे भांडे खरेदी करावे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अपेक्षित बदल होतील.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story