धनत्रयोदशीलाच का खरेदी करावी झाडू? शास्त्र काय सांगतं?

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Oct 29,2024

धनत्रयोदशी सण

धणत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीसोबत कुबेर देव आणि भगवान धन्वंतरीची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते.

खरेदी करा या वस्तू

धनत्रयोदशीच्या दिवशी घरात पूजा केल्याने सुख, सौभाग्य आणि समृद्धीचा वास राहतो. या दिवशी वस्तू खरेदी केल्याने विशेष लाभ होतो.

सोनं-चांदी खरेदी करणे शुभ

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, वाहनन, घर-जमीन, लक्ष्मी-गणेशची मूर्ती किंवा भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. यासोबतच झाडूची देखील खरेदी या दिवशी करतात.

का खरेदी करतात झाडू?

धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. याबाबत विस्तृत जाणून घेऊया.

लक्ष्मीचे प्रतिक

झाडूला लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते. अशावेळी धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. यामुळे घरी ऐश्वर्य, संपत्तीचा वास राहतो.

आर्थिक स्थिती होईल मजबूत

जर तुम्हालाही वाटत असेल की, लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहावी तर धनत्रयोदशीला झाडू खरेदी करा. यामुळे आर्थिक स्थिती अतिशय मजबूत होईल.

फूल झाडू करा खरेदी

धनत्रयोदशीच्या दिवशी फूलझाडू आणि साधी झाडू खरेदी करुन हा दिवस अतिशय शुभ आणि फलदायी दिवस साजरा करा.

VIEW ALL

Read Next Story