लसूण स्वयंपाकघरांममध्ये वापरला जाणारा मुख्य पदार्थ आहे. याशिवाय लसूण हे आपल्या आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर आहे.
लसणामध्ये ॲलिसिनसारखी संयुगे असतात; ज्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे अँटीव्हायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संक्रमणांशी लढा देण्यासही मदत होते.
लसणामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून आणि रक्तात गुठळ्या तयार होण्यापासून रोखणे शक्य होते.
कच्चा लसणाचे सेवन केल्याने कालांतराने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास हातभार लावू शकतो. पण, हा त्वरित उपाय नाही. जीवनशैलीच्या सवयींवर अवलंबून याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम दिसू शकतो.
लसणात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात; जे शरीरातील तणाव कमी करतात आणि आजारांचा धोका कमी करतात.
लसूण पचनास मदत करून आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि लसणातील प्रतिजैविक गुणधर्मांमुळे गॅस्ट्रोइंटेस्टायनल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.