1उन्हाळा जरी नकोसा नकोसा वाटत असला तरी एक बाबतीत तो हवा हवासा वाटतो. कारण या सिझनमध्ये येतो फळांचा राजा आंबा.
उन्हाळ्यात आंब्यावर ताव मारण्याची मजाच काही और असते.
दररोज एखादा तरी आंबा किंवा मग जेवणात एखादी लहानशी वाटी भरून आमरस हवाच.
पण तुम्हाला आंबा खाण्याची योग्य वेळ कोणती माहिती आहे का?
आहारतज्ञ मनप्रीत कालरा यांनी सांगितलंय की, चुकीच्या वेळी आंबा खाल्ल्याने पोटाच्या समस्या निर्माण होते.
आहारतज्ञ मनप्रीत कालरानुसार आंबा खाण्याची योग्य वेळ दुपारचं जेवण्यानंतर आहे. अगदी संध्याकाळच्या नाश्ताही तुम्ही आंबा खाऊ शकता.