जगात अनेकांना मांसाहार करायला आवडतं. महाराष्ट्रात गटारी अमावस्येनंतर मासांहार वर्ज्य असणार आहे. त्यामुळे रविवारपर्यंत मस्त नॉनव्हेजवर ताव मारला जाणार आहे. पण तुम्हाला माहितीय का जगात सर्वाधिक चिकन, मटन अन् फिश सर्वाधिक काय जास्त खाल्लं जातं.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या अहवालानुसार भारत, जपान आणि बांगलादेशमध्ये मासे, समुद्री मांस आणि चिकन हे सर्वात जास्त खाल्लं जातं.
अफगाणिस्तानमध्ये लोकांना मटण किंवा बकरीचे मांस जास्त आवडत.
अमेरिका आणि कॅनडमधील लोकांना सर्वाधिक चिकन खातात. तर रशिया आणि इस्रायलमध्येही बहुतेक लोकांना चिकन खायला आवडतं.
तर जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये लोकांना डुकराचे मांस खायला जास्त आवडतं. याशिवाय भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमधील बहुतांश लोकांना गोमांस खायला जास्त आवडतं.
ऑस्ट्रेलियन लोकांना चिकन खायला जास्त आवडतं. तर चीन आणि फ्रान्समध्ये सी फूड आणि मासे जास्त आवडतात.