आचार्य चाणक्य म्हणतात, की मनुष्याला आयुष्यात एकदा तरी दानधर्म करायलाच हवा.
जर एखादा मनुष्य संपूर्ण श्रद्धेने गरजुंना किंवा धार्मिक स्थळी दान करतो, तो मनुष्य नेहमी धनवान राहतो
आचार्य चाणक्य म्हणतात की, दान करणं शुभ कार्य आहे. दान केल्याने धन-दौलत वाढते
पण दान करताना एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे, असं आचार्य चाणक्य म्हणतात
मनुष्याला दान करायला पाहिजे. मात्र दान करण्यास जितके सक्षम असाल तितकेच दान करायला हवं
प्रत्येकाला आपली आर्थिक परिस्थिती पाहूनच दान करायला हवं.
आपली आर्थिक परिस्थिती न पाहता जो व्यक्ती दानधर्म करतो तो आयुष्यभर त्रासलेला राहतो
दान देत असताना नेहमी धन-संपत्ती किती आहे हे पाहूनच दान करायला हवे नाहीतर मनुष्याला बरबाद व्हायला वेळ लागत नाही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)