चाणक्य नितीः म्हातारपणात सुख हवंय; तारुण्यातच 'या' 5 सवयी अंगीकारा

आचार्य चाणक्य यांच्या चाणक्य नितीमध्ये शास्त्रानुसार मनुष्याच्या सर्व समस्यांचे निराकारण सांगितले आहे.

म्हातारपणात मनुष्याला सुख-शांती आणि ऐश्वर्य-मानसन्मान हवा असल्यास तारुण्यातच या पाच सवयी अंगिकारा

चाणक्यांनुसार वृद्धापकाळात तुम्हाला दोन वेळचं अन्न तुमची मुलं नाही तर तुम्ही त्यांना दिलेले संस्कार देतील.

मुलांसमोर तुम्ही स्वतःचे व्यक्तिमत्व चांगले ठेवले नाही तर वृद्धापकाळात ते तुम्हाला मान-सन्मान देणार नाहीत

चाणक्यांनुसार, देव चित्रात नाही तर चरित्रात वास करतो. जर तुमच्या चारित्र्यावर डाग असतील तर लोक म्हातारपणी तुम्हाला मान देणार नाहीत.

तुमच्या सामर्थ्यानुसार लोकांची मदत करत राहिले पाहिजे. त्यामुळं तुमचं पुढचं भविष्य सावरेल.

भेदभावामुळं नातेसंबंधात दुरावा येतो. त्यामुळं सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहा. कारण हीच लोक म्हातारपणी कामी येतात.

VIEW ALL

Read Next Story