लग्नाची खरेदी इथंच झाली पाहिजे; ब्रँडेड पण स्वस्त बस्ता मुंबईतील बेस्ट मार्केट

तुळशीच्या लग्नापासून लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात होते. तुमच्या घरात लगीन घाई असेल तर मुंबईतील या ठिकाणी ब्रँडेड पण स्वस्त बस्तासाठी तुम्ही नक्कीच जाऊ शकता.

दादर

मुंबईतील मराठी माणूस असो किंवा कुठल्याही दादर वेस्टमध्ये तुम्ही लग्नाचा बस्ता स्वस्तात बसवू शकता. या मार्केटमध्ये सुरत, राजस्थान इथल्या फॅक्टरीतून वेगवेगळे माल या मार्केटमध्ये मिळतो. त्यामुळे इथे होलसेल साड्यांचे रेट सर्वात कमी आहे. सोबत व्हरायटी आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टी इथे आहेत.

मंगलदास मार्केट

मुंबईतील दुसरं प्रसिद्ध मार्केट आहे ते म्हणजे मंगलदास मार्केट. इथे लग्नाच्या खरेदीसाठी कायम मोठी गर्दी असते. इथून आपल्याला लग्नात उठून दिसता येईल अशा सुंदर पोशाखत्या मोठ्या संख्येत व्हरायटी आहेत.

भुलेश्वर मार्केट

मंगलदास मार्केटपेक्षा भुलेश्वर मार्केटमध्ये तरुणी आणि महिलांची अधिक गर्दी कायम दिसते. याचं कारण म्हणजे महिलासांठी लेहेंगा, साड्या, शूज, दागिने हे इथे अव्वल दर्जाचे उपलब्ध आहेत. अगदी पूजेची थाळीपासून सुरेख दागिन्यांपर्यंत इथे सगळं मिळतं.

जुहू तारा रोड

विलेपार्ले पश्चिमेमधील जुहू तारा रोडवर हे मार्केटही लग्नाच्या खरेदीसाठी खूप प्रसिद्ध आहे. रितु कुमार, फाल्गुनी आणि शेन मयूर, मसाबा, मनीष अरोरा अशा अनेक फॅशन डिझायनर्सचे स्टोअरर्स जुहू तारा रोडवर तरुणींना आकर्षक करतात. या भागात किमया आणि अझा सारखे बुटीकदेखील आहे.

नटराज मार्केट

मालाड पश्चिम स्थानकाच्या शेजारी असलेलं नटराज मार्केट इथेदेखील तुम्ही लग्नाच्या खरेदीसाठी जाऊ शकता. इथे तुम्हाला लेहंगा, ड्रेस मटेरील, कॉस्मेटीक आणि एर्मोडरीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कोणत्याही सणाला इथे खरेदीसाठी लोकांची झुंबड असते.

हिंदमाता मार्केट

लग्नाचा ड्रेस, लेहेंगा, साड्या आणि दागदागिन्यांसाठी हिंदमाता मार्केट लग्नाची खरेदी आवडतं ठिकाण आहे. इथे परवडणारी स्टँडअलोन फॅब्रिक स्टोअर्स, बुटीक आणि अनेक मोठे शोरूम असून तुम्हाला बजेटमध्ये लग्नाची खरेदी करु शकता.

क्रॉफर्ड मार्केट

जर तुम्ही रेडीमेड पूजेची थाळी, कळश, भेटवस्तू आणि सजावटीच्या वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर क्रॉफर्ड मार्केट ही बेस्ट जागा आहे. तर तिथे असलेली लोहार चाळ ही खरेदीसाठी अजून एक चांगल ठिकाण आहे. सक्सेस कॉर्नर आणि न्यू बॉम्बे बॅग कॉर्नर ही बेस्ट दुकान आहेत.

लिंकिंग रोड

वांद्र्यातील लिंकिंग रोडवर स्टोअर्स, शॉपिंग मॉल्स, डिझायनर बुटिक, फ्ली स्टोअर्स आणि रस्त्यावरील विक्रेत्यांची एकाच ठिकाणी मांदियाळी लग्नाच्या खरेदीसाठी बेस्ट पर्याय आहे. त्यामुळे तुमचं बजेट काहीही असो, तुम्हाला लिंकिंग रोडवर नक्कीच काहीतरी तुमच्या मनासारखं मिळेल.

VIEW ALL

Read Next Story