पालक नेमके कुठे चुकतात?

BK Shivani On Parenting : भारतासह जागतिक स्तरावर नावाजलेल्या आध्यात्मिक गुरु बीके शिवानी यांनी पालकत्वाविषयीसुद्धा खास मार्गदर्शन करत पालक कुठं चुकतात हे सांगितलं आहे.

सर्वतोपरि महत्त्वं

मुलांच्या शारीरिक सुदृढतेला सर्वतोपरि महत्त्वं देण्यापेक्षा त्यांना भावनिकदृष्ट्या सक्षम करण्यावर जास्त भर द्या.

चांगला व्यवहार

मुलांचा व्यवहार चांगला असावा अशी अपेक्षा असणाऱ्या पालकांनी आधी स्वत:च्या आचरणात त्या गोष्टी आणाव्यात.

अनुकरण

लहान मुलं कायमच आई- वडिलांचं अनुकरण करतात. त्यामुळं आईवडिलांनीसुद्धा आचरणात सकारात्मक बदल घडवून आणावेत.

मुलांना खचवणारी कृत्य

आईवडिलांनी कधीच मुलांना खचवणारी कृत्य करू नयेत. उलटपक्षी त्यांना एक खंबीर व्यक्ती म्हणून घडवावं.

सतत ओरडू नका

मुलांना सतत ओरडून, दरडावून काहीही शिकवण्यापेक्षा त्यांना समजावून आणि त्यांच्या कलानं घेवून गोष्टी शिकवा, अधिक सोपं जाईल

तुलना नको

तुमची मुलं इतरांहून वेगळी आहेत, त्यामुळं त्यांची दुसऱ्या मुलांशी तुलना करू नका.

VIEW ALL

Read Next Story